Ticker

6/Breaking/ticker-posts

डिक्कीतून कॅश लांबविली

 


अहमदनगर
: - मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवलेली 1 लाख 40 हजार रुपये अज्ञात चोराने डिकी उघडुन नेले. हि घटना कापडबाजार भिंगारवाला चौकातील कापड दुकानासमोर घडली.


या बाबतची माहिती अशी की, अक्षय शाम जाधव (वय 24, रा.नालेगाव, दातरंगे मळा, नगर) यांनी त्यांच्या अ‍ॅव्हेंटर कंपनीच्या मोटार सायकल (क्र.एम.एच.16 बि.एल.7625) च्या डिक्कीत 1 लाख 40 हजार रुपये ठेवले.

जाधव यांनी त्यांची मोटार सायकल भिंगारवाला चौकातील कापड दुकाना समोर सोमवारी लावलेली असताना  अज्ञात चोरानी मोटार सायकलची  डिकी उघडुन आतील 1 लाख 40 हजार रुपयाची रोकड चोरुन नेली.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अक्षय जाधव यांच्या फिर्यादीवरुन भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास दिपक बोरुडे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या