Ticker

6/Breaking/ticker-posts

“बॅटरीवरील वाहनांचे देशातले पहिले प्रशिक्षण व संशोधन केंद्र भोसे गावात सुरू”

अमेरिकेतील विद्यापीठाची  उद्योजक

 श्रीकांत शिंदे यांना मानद डॉक्टरेट पदवी

लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

करंजी:- बॅटरीवर चालणारी गाडी कुठेही खरेदी करा ती दुरुस्त कशी करायची याचे देशपातळीवरील प्रशिक्षण व संशोधन मात्र पाथर्डी तालुक्यात येऊनच घ्यावे लागणार आहे बॅटरीवर चालणाऱ्या वाहन संशोधन व विकास केंद्राच्या माध्यमातून देशाच्या विविध भागातील व्यावसायिकांना तालुक्यातील भोसे येथील कारखान्यात येऊनच माहिती घेता येणार आहे . आगळेवेगळे व अचूक कार्य पाहत अमेरिकेतील विद्यापीठाने अवघ्या बारावी शिकलेल्या उद्योजक श्रीकांत शिंदे यांना मानद डॉक्टरेट पदवीने गौरविले आहे.                       

   तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील दुष्काळी पट्ट्यात करंजी पासून सहा किलोमीटर अंतरावर भोसे शिवारात गो गो मोटर्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करून येथील  श्रीकांत पोपटराव शिंदे या तरुणाने तालुक्यात पहिला उद्योग स्थापन केला. गो गो एवन डॉट .कॉम  व्यापार चिन्हातून त्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची डिझाईन तयार करणे, त्यासाठीच्या  सुट्या भागांची जोडणी करत जुन्या दुचाकीतीनचाकी,चारचाकी गाड्यांना सुद्धा रचनेत बदल करून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यामध्ये रूपांतर करण्याचा उद्योग सुरू केला .सुमारे दहा वर्षापूर्वी शिंदे यांनी चीनमध्ये अशा कंपनीत नोकरी केली व तेथून जुजबी ज्ञान मिळवत मुंबई येथे व्यवसाय सुरू केला परिस्थितीशी अत्यंत कठीण संघर्ष करत व्यवसायाला आकार देण्याचा प्रयत्न केला.कोरोना साथ सुऱु झाली. व्यावसायिक व औद्योगिक मंदीचे तीव्र परिणाम भोगावे लागून शिंदे यांनी गावाकडे उद्योग उभारून मुंबई येथे कॉर्पारेट ऑफिस ठेवण्याचा निर्णय घेतला .

             गावाकडे येऊन गावाकडील मुलांना रोजगार उपलब्ध होऊन पहिल्या टप्प्यात सुमारे 20 स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे कष्टाची तयारी व शिकण्याची इच्छा असेल तर स्थानिक इच्छुकांना आगामी काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे चार्जिंग स्टेशन, पॅकिंग बॉक्स, विविध प्रकारचे सुटे  भाग उत्पादन व वाहतूक मार्केटिंग प्रशिक्षण आदी क्षेत्रात तालुक्यात रोजगार वाढविण्याचा संयोजकांचा मानस आहे. उपक्रमाचे भविष्यकालीन महत्त्व व गरज पाहता सिंम्बॉयसिंस व  रायसोनी  विद्यापीठांनी या उद्योगाशी करार केला असून या संस्थेमध्ये आता बॅटरीवरील वाहन दुरुस्ती व  तंत्रज्ञानाबाबत प्रमाणपत्र, अभ्यासक्रम  घेता येणार आहे. शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी याच नावाने संस्था नोंदणी चीनमध्ये केली. काही काळ तिथे उत्पादन सुरू केले इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेत ईतर राष्ट्रांकडूनही अशा वाहनांच्या आराखड्याबाबत व तांत्रिक उपलब्धतेबाबत विचारणा सुरु झाली  आधुनिक व्यापाराचे अनेक पर्याय कंपनीकडून अमलात आणले जात आहेत. सध्या सायकल वर्गीय व तीन चाकी वाहनाचे डिझाईन तयार करून फॅब्रिकेशन ची कामे अन्य  व्यावसायिकांकडून केली जातात.  जुळणी करणे, पेटंट घेणे, उत्पादकांना वितरक मिळवून देणे अशी कामे सुद्धा कंपनीकडून केली जातात  मालाचा दर्जा व तांत्रिक परिपूर्णता पाहून दुबई मधून विक्रेत्यांनी मागणी नोंदवली आहे .

             कंपनीने आरामदाई बैठकी सह ऍक्टिवा सारखी तयार केलेले मॉडेल हैदराबाद येथील उत्पादक कंपनीने स्वीकारले आहे. कोरोनाने सर्वस्व गेले म्हणत निराश होण्यापेक्षा ती एक संधी समजून युवकाने गावात औद्योगिक नगरीचे रुप देण्याचा  ध्यास मनात घेऊन हाती घेतलेला उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.          याविषयी माहिती देताना श्रीकांत शिंदे म्हणाले चारचाकी वाहन उत्पादनाचा कंपनीचा मानस आहे. येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. सध्या आम्ही प्रतितास 120 किलोमीटर वेगाने धावणारी मोटरसायकल तयार केली आहे.

            अडचणीवर मात करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल टावर उभारला . शासनाने पंधरा वर्षांहून जुनी वाहने रद्द करण्याचा निर्णय घेतला .अशी वाहने बॅटरीवर चालवली जाऊ शकतात. देशाचे सर्वाधिक परकीय चलन इंधनावर खर्च होते. अशा वाहनांचा प्रचार व वापर जेवढा वाढेल तेवढी इंधन बचत होणार आहे. तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात त्यामुळे देशभर दळणवळण सुलभ ठरणार आहे. स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांचा दबाव दिवसागणिक वाढत आहे . त्यामुळे देशात वाहन विक्रीची उपलब्ध यंत्रणा सहकार्य करीत नसल्याने अशा विक्रेत्यांचे देशभर जाळे म्हणून त्यांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून  देण्यावर भर दिला जाईल  या कामात सर्व कुटुंबियां बरोबरच भाऊ सचिन, चुलते भरत ,यांचे सुद्धा मोठे योगदान आहे  दुष्काळी तालुक्याला आपला उद्योग  दिलासा देणारा ठरून जेवढी कल्पना शक्ती लढवू तेवढा ऊद्योगाचा विस्तार  होऊ शकेल.  सर्वकाही आम्ही करू शकत नाही अनेकांनी पुढे यावे हे हीच अपेक्षा असल्याचे शिंदे म्हणाले.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या