17
पैकी 16 जागांवर गडाख गट विजयी;
तुकाराम गडाख गटाला 1 जागा
सोनई :- सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत फक्त राज्याचे जलसंधारण
मंत्री शंकरराव गडाखांना विरोध करायचा केवळ या हेतूने "विरोध जिवंत ठेवायचा' यामुद्द्यावर
माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधक एकवटले होते. मात्र
सोनईकरांनी मतदानातून आपला कौल देत पुन्हा एकदा मंत्री गडाखांचे एकहाती सत्ता देत
दिली. यानिवडणुकीत 17 पैकी 16 जागांवर
मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळविला आहे. मागील 17 सदस्यांपैकी
नामदार गटाचे 16 व विरोधी गटाचा एक सदस्य होता .
दरंदले नवनाथ , दरंदले श्वेताली , ओहळ सावित्रा, वाघ धनंजय , पवार
सुनीता , तागड जयश्री , वैरागर किशोर ,
राऊत सविता ,हरकळे प्रसाद , सय्यद इंतेसाम,मचिंद्र कुसळकर , दरंदले विद्या , कुसळकर भाना , बोरुडे राजेंद्र , गडाख प्रभाकर, राशीनकर अलका हे नामदार गडाख गटाचे तर माजी खासदार तुकाराम गडाख गटाचे
शेटे शोभा निवडून आले आहे .
राजकारण, निवडणूक असो या सामाज कारण राज्याचे
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना नेहमीच विकासाचा मुद्दा महत्वाचा वाटला आणि
याच मुद्द्यावर ते निवडणुकांना सामोरे गेलेले तालुक्याने, जिल्ह्याने
अनुभवले आहे. मात्र सोनई ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच यावेळेस मंत्री गडाख
यांना घेरण्यासाठी माजी खासदार तुकाराम गडाख यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली माजी
आमदार बाळासाहेब मुरकुटे समर्थकांसह सर्व गडाख विरोधकांची मोट बांधत पॅनल तयार
केला.
मात्र मंत्री गडाख गटाने मुस्लिम, दलित,
धनगर सह सर्व समाजातील घटकांना उमेदवारी देत न्याय दिला. याउलट
तुकाराम गडाख गटाकडून नेहमीच्याच चेहेऱ्याना संधी दिली गेली . माजी खासदार तुकाराम
गडाख यांनी जुना विरोध तिखट करत घरोघरी जाऊन मते मागितली तसेच प्रचार फेरी काढल्या,
मंत्री गडाख यांच्या विरोधात अगदी खालच्या पातळीवर सभेत भडक
भाषणबाजी करत आरोपांची राळ उठवली.
लोकशाही पद्धतीने चालू असलेली ही निवडणूक 'मुद्द्यावरून गुडद्यावर' कशी येईल व आपल्याला सहानुभूती निर्माण करून आपण कशी राजकीय पोळी भाजून घेऊ असा ही प्रयत्न या निवडणुकीत तुकाराम गडाख व त्यांच्या समर्थकांनी केला अशी सोनईत चर्चा आहे त्यामुळे ही निवडणूक अगदी अटीतटीची होईल असे चित्र निर्माण केले . मात्र तुकाराम गडाख व त्यांच्या समर्थकांना सोनईकारांनी नेहमीप्रमाणे नाकारत मंत्री गडाख यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत गडाख गटाला एकतर्फी विजय बहाल केला. विशेष म्हणजे तुकाराम गडाख यांनी त्यांच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक्षात सहभाग घेतला नव्हता, मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय फड गाजविणाऱ्या तुकाराम गडाखांना थेट गावपातळीचे राजकारणात प्रत्येक्ष सहभाग घेऊनही त्यातही त्यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. देवगाव व कुकाणा, भेंडे वगळता इतर ठिकाणी नामदार गडाख गटाचे वर्चस्व राहिले आहे.
या निवडणुकीत गावपुढा-यांचे मनसुभे फोल ठरल्याने आखाडे चांगलेच रंगले
होते. शेवटच्या दोन दिवसात प्रत्येक मतदाराला गाठण्याचा प्रयत्न होत असतांना
मतदारांवर सोशल मिडीयाद्वारे भडीमार करण्यात आला .गटातटाबरोबरच भावकीच्या
राजकारणालाही रंग चढलेला दिसून आला.एकंदरीत ग्रामीण भागात
ग्रामपंचायतीच्याझालेल्या निवडणूकीत राजकीय कुरघोडी पाहण्यास मिळाली.
0 टिप्पण्या