अहमदनगर :- कायनेटीक चौक जवळ रोडच्या कडेला तीन दुचाकी वाहनांवर काही इसम संशयीत रित्या थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्या मुळे कोतवाली पोलीस स्टेशन चे पालीस निरिक्षक राकेश मानगांवकर लगेच रात्र गस्त च्या कर्मचारी यांना तात्काळ बोलावुन घेवुन सदर ठिकाणी जावुन तीन मोटार सायकल बर सात इसम ह संशयीत रित्या थांबलेले ,पोलीस पाहताच सदर ठिकाणा वरुन गाड्या सह पळुन जात असताना त्यातील दोन गाड्यांचा पोलीसांनी पाठलाग करुन त्याना पकडले.
कोतवाली पोलीसांनी दि ०६/०१/२०२१ रोजी पोलीसांनी पाठलाग करुन त्याना पकडले.तिस - या मोटार सायकल वरिल २ इसम हे त्यांचे कडील मोटार सायकल वर भरधाव वेगात सदर ठिकाणा वरुन पळुन गेले , तसेच सदर वेळी पाठलाग करन घरलेल्या इसमाना त्यांचे नाव विचारता त्यानी त्याचे नाव १ ) समीर खाजा शेख रा झारकर गल्ली अहमदनगर २ ) विशाल राजेंद्र भंडारी रा चिपाडेमळा सारसनगर अ नगर ३ ) परवेज महमुद सय्यद रा भासन आखाडा अ नगर ४ ) प्रतिक अर्जुन गर्जे रा सारसनगर अ नगर ५ ) अमोल संजय चांदणे रा चिपाडे मळा सारसनगर अ नगर अशी सांगीतली त्या नंतर त्यांचे कडील गाड्यांची व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कडे एक पल्सर मोटार सायकल , विना क्रं ची एक्सेस मोपेड मोटार सायकल , लोखंडी रॉड , ४ मोबाईल फोन , मिरची पुड , १ कोयता असे दरोड्या करिताच वापरते साहीत्य मुददमालासह मिळुन आल्याने नमुद ५ इसमांस ताब्यात घेतले . त्यांना पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता आम्ही चारी करण्या करिता एकत्र आलो होतो अशी त्यांनी कबुली दिली त्या प्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं २५/२०२१ भादवि ३ ९ १ , ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीताची अधिक चौकशी केली असता त्यांचे वर खालील प्रमाण मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत . ०१ ) समीर खाजा शेख याचेवर | गुरनं ५३२/२०१७ भादवि ३ ९९ , ४०२ आर्म अँक्ट ३ , ७/३५ प्रमाण कातवाली पोस्ट गुरंन २११ / २०१७ भादवि ३ ९ २.३४ प्रमाण भिंगार कॅम्प पोस्ट ३ ) गुरनं १६६/२०१८ भादवी १८८ प्रमाणे कोतवाली पोस्टे गुरनं ९ २३ / २०१ ९ महा पा का क १४२ प्रमाण कोतवाली पोस्ट गुरनं १७१६ / २०१ ९ महा पा का क १४२ प्रमाणे कोतवाली पोस्ट गुरनं ६७/२०२० महा पो का क १४२ प्रमाणे कोतवाली पोस्टे गुरंन ३२५/२०२० भादवि ४६१ , ३८० प्रमाणे कोतवाली पोस्ट गुरनं ४२०३/२०२० भादवि ३ ९ २.३४ प्रमाणे कोतवाली पोस्ट ०२ ) परवेज मेहमुद सय्यद याचेवर गुरनं ५८४४/२०२० भादवि ४६१ , ३८० प्रमाणे कोतवाली पोस्ट गुरंन ५८२३ / २०२० भादवि ३ ९ ४ , ३४ प्रमाणे कोतवाली पोस्ट या प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न
झाले.
इतर दोन आरोपींचा शोध घेणे चालु आहे
त्यांचेकडून अजुन अशा प्रकारचे गुन्हयाची उकल होण्याची शक्यता आहे . पुढील तपास
पोसई मनोज कचरे हे करीत आहेत . सदरची कारवाई ही मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज
पाटील सो ,
मा.अपर पोलीस
अधिक्षक श्री . सौरभ अग्रवाल सो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . विशाल शरद ढुमे सो , यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राकेश
मानगांवकर सो ,
व गुन्हे शोध
पथकाचे सपोनि विवेक पवार ,
पोसई मनोज कचरे , पोना गणेश धोत्रे , पोना रविंद्र टकले , पोना विष्णु भागवत , पोना नितीन शिंदे , पोना शाहीद शेख , पोकाँ भारत इंगळे , पोकॉ सुमित गवळी , पोकाँ योगेश कवाष्टे , पोका कैलास शिरसाठ , पोकाँ तान्हाजी पवार , पोका प्रमोद लहारे , पोकाँ सोमनाथ राउत , पोकाँ सुशिल वाघेला , पोकाँ सुजय हिवाळे यांनी सदरची कारवाई केली
आहे
0 टिप्पण्या