नेवासा :- नेवासा तालुक्यातील चांदा येथील मोरंडी शिवारात ज्ञानेश्वर दहातोंडे यांची शेळी बिबट्याने केली ठार .याबाबत सविस्तर वृत्त असे की ज्ञानेश्वर अर्जुन दहातोंडे हे चांदा शिवारातील गट नंबर १५९ मध्ये संजय पाराजी दहातोंडे यांच्या मोकळ्या शेतामध्ये शेळ्या चारीत असताना शेजारच्या उसामध्ये दबी धरून बसलेल्या बिबट्याने पाणी पिण्यासाठी शेळ्या गेल्या असता त्या बिबट्याने गाभन असलेल्या शेळीवर झडप मारली व ती ठार केली शेळी ओरडल्याचा आवाज आल्याने संजय दहातोंडे व ज्ञानेश्वर दहातोंडे हे त्या दिशेने धावले असता त्यांनी आरडाओरड केला व तो बिबट्या शेळी ठार करून पळाला ही घटना दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली चांदा परिसरामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत आहे काही दिवसापूर्वी गोविंद जावळे यांच्या वस्तीवर बिबट्याने दहशत केली होती तसेच मोरंडी शिवारात हीदेखील अनेकांनी या बिबट्याला पाहिले असून बऱ्याच दिवसापासून त्याचवास्तव्य या परिसरात असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले रात्रीच्या वेळेस बिबट्याच्या दहशतीने कोणताही शेतकरी या परिसरामध्ये दारे धरण्यासाठी फिरकत नाही दिवसादेखील शेतमजूर बिबट्याच्या भीतीने कामाला येत नाही लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरी संजय पाराजी दहातोंडे, रवींद्र डाके ,अमोल दहातोंडे, मच्छिंद्र दहातोंडे ,बाळासाहेब दहातोंडे ,गोवर्धन दहातोंडे विजय दहातोंडे, अशोक दहातोंडे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे .
0 टिप्पण्या