Ticker

6/Breaking/ticker-posts

बीलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई त्वरित थांबवावी; पाथर्डी मनसेची मागणी

 

लोकनेता न्यूज  ऑनलाईन

पाथर्डी:- चुकीच्या वीजबीलाच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने तालुक्यातील घरगुती व शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरु केली आहे ही पठाणी वसूली मोहीम  तातडीने थांबवावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांना देण्यात आले.

   यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ,परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाट,उपजिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण,तालुका ऊपाध्यक्ष अशोक आंधळे,लक्ष्मण डांगे,शहर सचिव संदिप काकडे,सुभाष घोरपडे,शहर ऊपाध्यक्ष राजु गिरी,विभाग अध्यक्ष गणेश कराडकर आदिंसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

   यावेळी बोलताना मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी सांगितले की,कोरोना महामारी च्या अभुतपूर्व लाॅकडाऊन नंतर सर्व सामान्य मानसाची घसरलेला आर्थिक परिस्थिती अत्यंत धिम्या गतीने सुधारते आहे.मात्र याच लाॅकडाऊन च्या काळात वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना सहानुभूती दाखवने गरजेचे असताना उलटपक्षी लाॅकडाऊन काळात मीटर रिडींग न घेतल्यामुळे सहा सात महिन्याचे एकत्रित अव्वाच्या सव्वा असे भरमसाठ वीज बिल पाठवुन सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.सहा महिण्याचे एकत्रित वीज युनीट मोजण्यामुळेच ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आल्याचे कंपनीची ही तांत्रिक चुक झाल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ऊर्जामंत्र्याच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर त्यांनीही चुक झाल्याचे मान्य केले व ग्राहकांना वीज बिल सवलत देण्यात येईल असे जाहीर केले होते.

            परंतु जाहीर केलेली सवलत मात्र बिलात अद्याप दिसुन आलेली नाही त्यामुळे अनेक वीज ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले व त्यामुळे या काळातील वीज बिल थकली गेली आहेत. तीच परिस्थिती ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाचीही झाली,कोरोना लाॅकडाऊनच्या काळात मार्केट कमीट्या बंद असल्याने शेतकर्यांनी पिकवलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला,काही शेतकर्यांनी बाजारात शेतमाल नेऊन विकुनही मुद्दलही वसुल होत नसल्याने तयार फळबागा व भाजीपाल्यात ट्रॅक्टर घातला,बाजारभाव नसल्याने उद्ध्वस्त झालेला शेतकरी नंतरच्या चांगला झालेल्या पावसाने सुखावला व ऊपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन कोरोना काळातील तोटा काही अंशी भरुन येईल या आशेवर गहु,हरबरा,कांदा,तुर आदि पिकांची लागवड केली त्यात तुर,हरबरा,ज्वारी पिकांवर ढगाळ हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला व गहू व कांदा पिकांची परिस्थिती चांगली असतानाच पिकांना पाणी देण्याच्या ऐन भरात वीज वितरण कंपनीने मोंगल व ब्रिटिशांनाही लाजवेल अशी कृती सुरू केली व गावागावात वीज बिल भरा अन्यथा संपूर्ण फिडर किंवा सर्व रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला. 


एकीकडे हे आघाडी शासन शेतकरी व सर्व सामान्यांच्या हिताचा आव आनत असतानाच दुसरीकडे मात्र स्वतः दिलेल्या चुकीच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी नागरीकांना अंधारात ठेवण्याचे व शेतकर्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्याचे पाप हे शासन
  व वीज वितरण कंपनीचे अधिकारी करत आहेत, हा सर्व प्रकार तातडीने थांबवावा अन्यथा मनसेला सर्वसामान्य नागरिकांच्या व शेतकर्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा ईशाराही यावेळी देण्यात आला,मनसेच्या वतीने केलेल्या मागणीची तीव्रता पाहुन तहसीलदार मा.शाम वाडकर यांनी लगेचच विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता निलेश मोरे यांच्याशी संपर्क करुन वीजबीलाच्या वसुलीसाठी कुठल्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित करु नये असे आदेश दिले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या