Ticker

6/Breaking/ticker-posts

म्हणून ... ग्रंथालये ही ज्ञानाची मंदिरे - पालवे

अहमदनगर - मराठी  ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा असून हीआपल्यासाठी गौरवाची बाब आहे , ज्ञानाचा बहुतांश भाग मराठीतच उपलब्ध आहे हे सर्व  साहित्य ग्रंथालयामध्ये वाचकांसाठी उपलब्ध असतं ,त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रंथालय ही ज्ञानाची मंदिरे झाली आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी केले . 

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ,अहमदनगर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन पालवे यांच्या हस्ते झाले यावेळी ते  बोलत होते . अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राध्यापक गणेश भगत होते . या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी जयंत येलुलकर उपस्थित होते 

साहित्य चळवळ वाढीसाठी नवोदित लेखकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे .मराठी  भाषेला मोठी परंपरा, इतिहास आहे. दैनंदिन जीवन जगत असताना मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर सर्वांनी करायला हवा असे आवाहन प्रा. भगत यांनी केले. 

 . स्वागत व प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी करून  या ग्रंथप्रदर्शनामध्ये मराठीतील साहित्यिक व साहित्य विषयक निवडक दर्जेदार ग्रंथांचे प्रदर्शन याठिकाणी दिनांक 28 जानेवारी पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त रसिक वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरीक्षक  रामदास शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले याप्रसंगी जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे ,नितीन भारताल, दिपा निसळ वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप नन्नवरे , अमित सरोदे ,महिमा कांबळे ,श्रीराम पोळ आदींसह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या