हजारे यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने दोन वेळा आंदोलन केले असून सरकारने त्यांना लेखी आश्वासन दिले . तथापि या गोष्टीला दोन वर्ष उलटून गेले तरी विचार होत नसल्याबथल पुन्हा एकदा या महिना अखेरीस दिल्लीतील रामलीला आंदोलन करन्यासाठी परवानगी मागितली आहे . मात्र एकीकडे आश्वासनाची पूर्तता करायची नाही अन् दुसरीकडे आंदोलनासाठी परवानगीही दयायची नाही . असे धोरण सरकारचे दिसू लागल्याने अण्णा संतापले आहेत .
मी आंदोलन करतोय म्हणून सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप करून ते म्हणाले एका फकीर माणसासी असे वागणे सरकारला शोभत नाही . शांतता व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करणे ह्रा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे . माझा अंत पाहू नका अन्यथा २०११ मध्ये जनतेने कॉंग्रेस सरकारला शिकवला तसा धडा तुम्हाला ही शिकवेल असा इशारा दिला आहे .
0 टिप्पण्या