*दिनांक:०३ जानेवारी, २०२१, सायंकाळी ६-३० वा*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०१ टक्के*
अहमदनगर: जिल्ह्यात आज ७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ३०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०२६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८ आणि अँटीजेन चाचणीत ११ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, नगर ग्रामीण ०४, संगमनेर १८, शेवगाव ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०२,जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०४, पारनेर ०७, पाथर्डी ०१, राहाता ०४, संगमनेर ०७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ११ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कर्जत ०१, कोपरगाव ०६, नेवासा ०१, पाथर्डी ०२, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २१, अकोले ०२, जामखेड ०७, कर्जत ०४, कोपरगाव ०७,, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०४, पारनेर ०१, पाथर्डी ०६, राहाता ०७, संगमनेर ०५, शेवगाव ०१, श्रीरामपुर ०२ आणि जिल्हा बाहेरील ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*माझेकुटुंब_माझीजबाबदारी*
0 टिप्पण्या