Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक निवडणूक : खा . पवारांचे उपस्थितीत खलबते रंगणार

 नगर : आशिया खंडात नावलौकिक प्राप्त अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून या दरम्यान आज


रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जिल्हा दौऱ्यावर येत आहे . यानिमित्ताने बँकेबाबत पुढील रणनिती काय ठरवायची याची चर्चा होणार आहे .

जिल्हा बँकेत या वेळी प्रथमच  पक्षीय राजकारण आले आहे  त्यानुसार . भाजपने  स्वतंत्र लढण्याचे ठरविले आले. पर्यायाने आघाडीला देखिले सणांगणात लढावेच लागणार आहे . त्या दृष्टीने आज दुपारी आ . अरूण काक जगताप यांच्या निवासस्थानी स्नेह् भोजनाचे वेळी निवडक कार्यकर्त्याशी पवार साहेब चर्चा करणार असल्याची माहिती आहे . 

जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी विखे पा . यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कंबर कसली असून जोरदार तयारी चालविली आहे . त्यांच्या विरूद्ध आघाडीची कमान मंत्री थोरांतांवर सोपवून पवार साहेब काय रणानिती आखतात याचि उत्सूकता निर्माण झाली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या