अहमदनगर :- दि नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वस्तात सोने
देण्याचे आमिष दाखवून दरोडा घालणारा फरार आरोपी पांडया उर्फ पांडुरंग भारम भोसले , वय- २६
वर्षे , रा . पढेगाव , ४५ चारी ,
ता- कोपरगाव यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शिताफीने पकडला.
दिनांक ०७ / ०७ / २०१ ९ रोजी फिर्यादी दिनेश
दगडू पाटील ,
रा . सुमतीवसंत अपार्टमेंट , पाटील लेन ,
नाशिक यांना आरोपी नामे भगीरथ भोसले , हिरु
भोसले , दोघे रा . पढेगांव , ता .
कोपरगाव यांनी व त्यांचे साथीदारांनी मिळून १०,००,००० / -रु . कि.स एक किलो सोने स्वस्तात विकत देण्याचे अमिष दाखवून
फिर्यादी यांना सावळगाव शिवार , ता . कोपरगाव येथे बोलावून
घेवून मारहाण करुन फिर्यादी जवळील रोख रक्कम , मोबाईल व
सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १०,७४,०००
/ -रु . किंचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता .
सदर
घटनेबाबत फिर्यादी यांनी कोपरगाव तालूका पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन
गुरनं । १०४ / २०१ ९ ,
भादवि कलम ३ ९ ५ , ४२० प्रमाणे दाखल करण्यात
आलेला होता . सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने व वेळोवेळी
संघटीतपणे गुन्हे करीत असल्याने सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधि .
कलम ३ ( १ ) ( IT ) , ३ , ( ३ ) व ३ (
४ ) ही कलमे लावण्यात आलेली होती . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील
आरोपी हे नजरेआड झालेले होते . सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेणेकामी मा .
पोलीस अधीक्षक साो , अहमदनगर यांचे आदेशाने पोनि. अनिल कटके ,
स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी स्वतंत्र
पथक नेमले होते . त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यातील फरार
आरोपींचा शोध घेत असताना पोनि. अनिल कटके यांना गोपनिय माहीती मिळाली कि , सदर गुन्ह्यातील फरार आरोपी पांड्या उर्फ पांडूरंग भोसले , रा . पढेगांव , ता . कोपरगांव हा त्याचे घरी पढेगांव
येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील सफी मोहन गाजरे ,
पोहेकॉ / बाळासाहेब मुळीक , पोना शंकर चौधरी , सचिन आडबल ,
विशाल दळवी , दिपक शिंदे , राहुल सोळुके , रणजीत जाधव , रोहीत
यमुल , चापोना चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून पढेगांव येथे
जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून मिळालेल्या माहितीचे आधारे सापळा
लावून आरोपी नामे पांडया उर्फ पांडुरंग भारम भोसले , वय- २६
वर्षे , रा . पढेगाव , ४५ चारी ,
ता- कोपरगाव यांस ताब्यात घेवून कोपरगांव तालूका पो.स्टे . येथे हजर
केले आहे .
पुढील
कार्यवाही कोपरगांव तालूका पो.स्टे . हे करीत आहेत . वरील नमुद आरोपी पांडया उर्फ
पांडुरंग भारम भोसले याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) कोपरगांव
तालूका पो.स्टे . गुरनं . 1
४५/२०२० , भादवि कलम ३२६,१४३ , १४७ , १४८,१४ ९ ( फरार ) २ ) कोपरगाव पो.स्टे . गुरनं . 1३४७/२०१४
, भादवि कलम ३ ९ ५,४२०,३४ सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील सा . पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्रीमती . दिपाली काळे मॅडम ,
अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व मा . श्री .
संजय सातव साो . उपविभागीय पोलीस अधिकारी , शिर्डी विभाग
यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी
यांनी केलेली आहे
0 टिप्पण्या