Ticker

6/Breaking/ticker-posts

पारनेर तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; महसूलसह राज्य उत्पादन शुल्क,पोलीस दिलजमाई..?

 


मुळा नदीपात्रातील अवैध वाळूची सर्रास वाहतूक,पोलिस व महसूल प्रशासन गप्प का ?

लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

टाकळी ढोकेश्वर:- पारनेर तालुक्यात अवैध वाळूसह दारूचा सुळसुळाट वाढतच असून याला महसूल,राज्य उत्पादन शुल्कसह पोलिस प्रशासन अधिका-यांचे मोठे अभय आहे.महसूल,राज्य उत्पादन शुल्कसह जिल्हा पोलीस अधिकारी सर्रास महसूल गोळा करण्यात गुंग असल्याचे चित्र टाकळी ढोकेश्वरसह तालुक्यात सर्रास पाहावयास मिळत आहे.

       दरम्यान पांगमल सारख्या प्रकरणांच्या घडना ताज्या असतानाही राज्य उत्पादन शुल्क प्रशासन गप्प का ? गप्प बसविण्यासाठी तालुक्यात काय काय हातबांधे आहे हे मात्र कुणालाच कळेनासे झालेत का? यातच अवैध प्रवासी वाहतूक,अवैध दारू,अवैधवाळू वाहतूक,अवैध वृक्षतोड,अवैध मावा, गुटखा,जुगार सारेच धंद्यांचे महसूल अधिकारी,पोलिस लागेबांधे असल्याने महसूलसह पोलिस खाते निर्ढावले असून राजरोसपणे यात निष्पाप जनता यात बळीचा बकरा ठरत आहे.

किंबहुना  तडजोडीचा तालुका म्हणून पारनेरचे नाव जिल्हयात अव्वल ठरू पाहत आहे.

,महसूलसह राज्य उत्पादन शुल्क,पोलीस दिलजमाई...!

पारनेर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अवैध धंदयांना उत आला असून महसूल राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्या तडजोडीत सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून फक्त तडजोडीवरच अवैध धंदे तेजीत असून राज्य उत्पादन व पोलीस प्रशासन महीण्याकाठी लाखो रूपयांची तडजोड करत असल्याने तडजोडीचा तालुका म्हणून पारनेर नाव जिल्हयात अव्वलस्थानी म्हटले तरी वावगे ठरणार नाही?

महसूलसह पोलिस विभाग तर कानावरच हात ठेवल्याचे सोंग...!

पारनेर तालुक्यातील पोखरी,देसवडे,मांडवे,पळशी,तास वनकुटे सह मुळानदी पात्रात खुलेआम अवैध वाळू उपसा सुरू असताना महसूल विभाग मात्र कानावर हात ठेवल्याचे सोंग करत आहेत.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या