Ticker

6/Breaking/ticker-posts

विकासच नाही तर विश्वास ठेवायचा कसा ? रोहित पवार म्हणजे हवेत गोळीबार- राम शिंदे

 

जामखेड/ कर्जत  :- कर्जत जामखेड मतदार संघात एक रुपयांचा निधी आणला नाही,अजून एक हि काम मार्गी लावले नाही ,मग विकास झालाच नाही तर जनतेने  विश्वास ठेवायचा कसा ? असा सवाल उपस्थित करून भारतीय जनता पक्षावर आमदार रोहित पवार यांना टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही . कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने निम्म्यापेक्षा जास्त जागा ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकल्या  असून आमच्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या असे दाखवत रोहित पवार यांनी 80 टक्के जागा राष्ट्रवादीने जिंकल्याचा  हवेत गोळीबार केला आहे अशी खरमरीत टिका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

     शिंदे यांनी चौंडी  व कर्जत येथे  पत्रकार परिषद घेऊन ग्राम पंचायत निवडनुक निकालावर विस्ताराने माहिती दिली. जामखेडमधील  ४९ पैकी २३ ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात तर २०३  ग्रामपंचायत सदस्य भाजपचे निवडणून आले असल्याचा दावा माजी मंत्री राम शिंदे यांनी दि २० जानेवारी रोजी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार चोंडी येथील निवासस्थानी घेतेलेल्या पत्रकार परिषेद केला .यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत , जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे , पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर , रवी सुरवसे , नंदू गोरेभाजप उपजिल्हाध्यक्ष संजय कार्ले, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात , प्रसाद ढोकरीकर, पोपट राळेभात, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले , प्रविण चोरडीया , केशव वनवे , लहू शिंदे, सरपंच काकासाहेब धांडे, डॉ अल्ताफ शेख ,शरद हजारे , अंकुश शिंदे , गोरख घनवट , पांडुरंग उबाळे , उद्धव हुलगुंडे , यांच्या सह भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद उपस्थित होते.

            तालुक्यातील ४०  ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केले असल्याचे वक्तव्य  आमदार रोहित पवार  यांनी केले आहे. या वक्तव्याला कोणताही आधार नसून त्यांच्या  आकडेवारी मध्ये घोळ झाला असल्याचा टोला आमदार रोहित पवार यांना राम शिंदे यांनी लगावला. हि आकडेवारी  लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारे आहे . 49 पैकी 23 ग्रामपंचायत या भाजपाच्या आहेत . तर खर्डा, आरणगाव, याठिकाणी काठावरचे बहुमत आहे. त्या गावात देखील भाजपचा सरपंच होणार असल्याचे त्यांनी  सांगितले. आजही लोकांचा भाजपाच्या विकासावर विश्वास आहे . भाजपने 25 वर्षे विकासाच्या माध्यमातून  दहशत निर्माण केली असल्याचे यावेळी बोलत होते. तालुक्यातील तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीची निवडणूक होती, यापैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 39 ग्रामपंचायती निवडणूक झाली एकुण 417 सदस्यांपैकी पैकी 203 सदस्य भाजपाचे निवडून आहेत.

            कर्जतमध्ये आज माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.  तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकालाचा आढावा घेतला।  यावेळी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत तालुका अध्यक्ष डॉक्टर सुनील गावडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे पप्पू शेठ धो दाड विनोद दळवी ज्ञानदेव लष्कर अमृत काळदाते  अनिल गदादे सुनील यादव वैभव शहा व शेखर खरमरे हे उपस्थित होते.

 ग्रामपंचायत निवडणुकीपासून आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत आमदार रोहित पवार यांनी तालुक्यामध्ये 80 टक्के पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाने जिंकल्याचा दावा केला आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की तालुक्यातील 508 ग्रामपंचायतीच्या जागांपैकी 238 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकले आहेत जवळपास 50 टक्केपेक्षा जास्त यश भाजपाला एकट्याला मिळाला आहे यामुळे खोट बोल पण रेटून बोल ही रोहित पवार यांची शेती आहे यासाठी सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्याचा त्यांचा हातखंडा आहे.

कुकडीच्या इतिहासात प्रथमच शेतकरी वंचित

            कुकडीच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांना जानेवारी महिना आला तरी अजून आवर्तन मिळाले नाही याला आमदार रोहित पवार हे जबाबदार आहेत अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी करताना आज शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याअभावी पिके जळून गेली आहे जानेवारी महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना तुन आवर्तन कुकडीच्या पाण्याचे यापूर्वी मिळत होते। परंतु मतदारसंघांमध्ये नवे पर्व आल्यामुळे आता सर्व काही ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडताना दिसून येत आहेत. शेतीला पाणी नाही एवढेच नव्हे तर तुझे रोहित्र तुझी जबाबदारी योजना यांनी आणली आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वतः रोहित्र दुरूस्त करण्यासाठी आणावे लागत आहे आणि आणले तरी ते दुरुस्त करून महावितरण'कडून मिळत नाही. यामुळे कालव्याचे पाणी नाही आणि विहिरीचे पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे दिसून येतो ,याची सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करण्यापेक्षा आपण काय करतो आणि काय केले आहे हे जनतेसमोर मांडणे जास्त योग्य राहील. गेल्या दीड वर्षांमध्ये जनतेने खोटे पर्व काय असते याचा आता चांगलाच अनुभव घेतल्याचे दिसून येते असेही राम शिंदे यावेळी म्हणाले

            यावेळी त्यांनी मका केंद्र सहा दिवसात बंद केले तूर खरेदी केंद्र सुरू झालेले नाही, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, मी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार करीत आहेत अशा विविध मुद्द्यांच्या आधारे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रखर टीका केली.

आता राम शिंदे यांच्या टीकेला आमदार रोहित पवार काय उत्तर देतात याकडे तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या