Ticker

6/Breaking/ticker-posts

व्ही आर डी ई स्थलांतराच्या चर्चांना मिळणार पूर्णविराम- खा. डॉ सुजय विखे पा.


खासदार डॉ. सुजय विखे यांच्या दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका

अहमदनगर :- अहमदनगर येथील व्‍हीआरडीई स्‍थलांतरीत करण्‍याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या  नेतृत्‍वाखाली आत्‍मनिभर भारत योजनेतून या संस्‍थेचे अधिक मजबुतीकरण करण्‍याची ग्‍वाही व्‍हीआरडीईच्‍या पदाधिका-यांनी दिल्‍याने गेल्‍या दोन दिवसांपासुन सुरु झालेल्‍या या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला असल्‍याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

   अहमदनगर येथील व्‍हीआरडीई संस्‍था स्‍थलांतराच्‍या संदर्भात मागील दोन दिवसांपासुन सुरु झालेल्‍या विषयाच्‍या पार्श्‍वभूमिवर खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिल्‍लीत व्‍हीआरडीईचे चेअरमन यांचे तांत्रिक सल्‍लागार संजिव कुमार यांच्‍यासह तसेच संरक्षण विभागाच्‍या वरिष्‍ठ आधिका-यांची भेट घेवून अहमदनगर येथील संस्‍था हलविण्‍याच्‍या संदर्भात शहनि‍शा केली. त्‍यानंतर त्‍यांनी या भेटी संदर्भात माध्‍यमांना माहीती दिली.

     याबाबत बोलताना खा.डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, अहमदनगर येथील व्‍हीआरडीई संस्‍था स्‍थलांतरीत करण्‍याचा कोणताही प्रस्‍ताव संरक्षण विभागाचा नाही. याबाबत वरिष्‍ठ आधिका-यांनी सुरु झालेल्‍या चर्चा या निरंर्थक असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. मागील अनेक वर्षांपासुन असलेली व्‍हीआरडीई संस्‍था नगर येथेच राहण्‍याबाबत ग्‍वाही देताना भविष्‍यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या  मार्गदर्शनाखाली आत्‍मनिर्भर भारत योजनेतून संरक्षण विभागाच्‍या या संस्‍थेचे अधिक बळकटीकरण करण्‍याचा केंद्र सरकारचा मानस आहे.  अन्‍य  प्रकल्‍पही देण्‍याबाबतचा विचार व्‍हीआरडीईच्‍या आधिका-यांनी बोलून दाखविल्‍याने जिल्‍ह्याच्‍या दृष्‍टीने अभिमानाची बाब ठरेल असा विश्‍वास खा.डॉ.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. याबाबत नगर येथील व्‍हीआरडीई मधील आधिकारी आणि कर्मचा-यांशी आपण स्‍वत:भेट घेवून याबाबतची अधिक माहीती देणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या