ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर :- गेल्या वर्षी आलेल्या
करोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परीस्थीतीवर मात करण्यासाठी राज्य पतसंस्था
फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा
पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या माध्यमातून गेल्या नऊ महिन्यांपासून
वेळोवेळी डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करून पतसंस्थांचा कारभार
सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही समस्या व प्रश्न एकत्र येवूनच
सोडवल्या जाऊ शकतात. यासाठीच दि. ३१ जानेवारी व एक फेब्रुवारी रोजी संगमनेर येथे
सहकार संवाद प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी
दिली.
अधिक माहिती देतांना राज्य
पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, रविवार दि. ३१ जानेवारी रोजी
संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे सकाळी साडेनऊ वाजता राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब
थोरात यांच्या हस्ते सहकार संवाद कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आ.सुधीर
तांबे, निफाडचे आ.दिलीप बनकर, विभागीय
सहनिबंधक ज्योती लाटकर, विभागीय सहनिबंधक राजेंद्र शहा,
विभागीय निबंधक गौतम बलसाणे आदींसह नाशिक विभागातील सर्व
जिल्ह्यांचे उपनिबंधक उपस्थित राहणार आहेत. आता करोनाचा प्रदुर्भाव कमी झाल्याने ९
महिन्यांच्या कालावधीनंतर एकत्र येत पतसंस्थांच्या विविध प्रलंबित समस्यांवर मार्ग
काढण्यासाठी या सहकार संवाद कार्यशाळेचे आयोजन केले आहे. नाशिक विभागातील
जास्तीतजास्त पतसंस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे
आवाहन त्यांनी केले आहे.
सहकार संवाद कार्यशाळेच्या
प्रचारासाठी नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकताच पाचही
जिल्ह्याचा दौरा केला आहे. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी पतसंस्था स्थैर्यनिधी
संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, विभागीय फेडरेशनचे उपाध्यक्ष गोपाळ पाटील
आदींसह संचालक प्रयत्नशील आहेत.
0 टिप्पण्या