Ticker

6/Breaking/ticker-posts

जामखेड तालुका :- सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

 

लोकनेता न्यूज  ऑनलाईन

जामखेड :- जिल्ह्यात 58 ग्रामपंचायती असून, गुरूवार सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली. आरक्षण सोडतीनंतर ' आसू आणि हसू झाले असल्याचे चित्र होते.काही ग्रामपंचायत मध्ये आरक्षण पडल्याने हिरमुस झाला तर काही ठिकाणी आपल्या मनासारखे आरक्षण पडल्याने हसू आले आहे.

   तालुक्यातील एकूण 58 ग्रामपंचातींमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 36 तर त्यामध्ये महिलांसाठी 18 पदे आरक्षित आहे . नागरिकांच्या मागास प्रवर्ग करता आरक्षित 16 असून , यामध्ये महिलांसाठी 8 पदे आरक्षित आहेत . अनुसूचित जमाती करता आरक्षित - पदे १ असून, अनुसुचित जाती करिता 5 ग्रामपंचायत असून त्यापैकी महिला 3 अशी सोडत झाली आहे . विशेषत : काही प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये अपेक्षित आरक्षण पडावे म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्यांचा मात्र आरक्षणाने हिरमोड झाला आहे.

  ग्रा.पं.मध्ये 29 ग्रामपंचायत महिलाराज असणार आहे. जामखेड तालुक्यातील 58   ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली . नुकत्याच झालेल्या ४९ ग्रा.पं.च्या निवडणुकीनंतर अनेक इच्छुकांचे या आरक्षणाने पत्ते कापले आहेत . त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला॰

सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित- तालुक्यातील प्रमुख  खर्डा, आनंदवाडी,खांडवी डिसलेवाडी, जातेगाव, जायभायवाडी, डोणगाव,तेलगशी,दिघोळ माळेवाडी,धामणगाव,धोंड पारगाव,नाहुली,पिंपळगाव आळवा, फाक्राबाद,बोर्ले,राजुरी डोळेवाडी, शिऊर,साकत पिंपळवाडी कोल्हेवाडी,सातेफळ, या 18 गावांमध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित आहे.

 सर्व साधारण साठी-

तर आरणगाव पारेवाडी,कुसडगाव सरदवाडी,घोडेगाव,चोभेवाडी, झिक्री,देवदैठण, नान्नज,पाडळी,पिंपरखेड, पोतेवाडी,बावी,मतेवाडी, लोणी,वाघा,सावरगाव,सोनेगाव,वाकी,सारोळा काटेवाडी या 18 गावात सर्व साधारण साठी आहे.

अनुसूचित जाती महिला साठी- हळगाव, धनेगाव,रत्नापूर, आरक्षित तर कवडगाव ,जवळा या गावात अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित आहे.तर अनुसूचित जमाती सर्व साधारण गुरेवाडी महारुळी साठी आरक्षित आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-

तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मध्ये आघी,खुरदैठण,चोंडी,तरडगाव दौंडवाडी वंजारवाडी, नायगाव,बाळगव्हाण,मोहरी,मुंजेवाडी या आठ गावात आरक्षित आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण मध्ये आपटी, जवळके, धानोरा,मोहा, पाटोदा,पिंपळगाव उंडा,बांधखडक,राजेवाडी, हे आरक्षित आहे अशा पद्धतीने तालुक्याचे आरक्षण जाहीर झाले आहे.

 
तालुक्यातील  29 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे. या आरक्षणामुळे कही खुशी कही गम प्रत्यय आला आहे.तालुक्यातील नुकत्याच 49 ग्रामपंचायत च्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर 39 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत समोर समोर लढत झाली त्यामध्ये अनेक ग्रामपंचायत निकाल धक्कादायक लागले आहेत.तर त्यातील काटवरचे बहुमत असलेल्या ग्रामपंचायत चे सदस्य फिरण्यासाठी गेले आहेत त्यामुळे आता सर्वांची नजर सरपंच पदाची निवडणूक कधी होतेय हे पाहणे अत्सुक्याचे ठरणार आहे. 

ही निवडणुका पार पाडण्यासाठी प्रांत अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसिलदार नवनाथ लांडगे ,गटविकास अधिकारी परशुराम कोकणी,आदी अधिकारी उपस्थित होते.तसेच यासाठी तालुक्यातील 58 गावातील ग्रामपंचायत सदस्य  व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या