काढणीला आलेला लाल कांदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा , या पिकाचे मोठं नुकसान
पाथर्डी:- जे पिकलं होतं, त्याची पुन्हा एकदा माती झाली असुन हातातोंडाशी आलेलं पिक अवकाळी पावसाने झोडपून काढलं. ऐन हिवाळ्यात अचानक कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवले आहे .
मढी व परीसरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस होत आहे . मढी ,निवडूंगे तिसगाव या परिसरात अक्षरशा पावसाने झोडपून काढले आहे मढी येथे तर ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे .पाऊस आणी वारे यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिले असुन . शनीवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात एक तास बरसत होता नदया लहान मोठे नाले तुडुंब भरून वाहिले .पिकांचे पंचनामे होऊन त्याची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.. पावसाने उघड्यावर पडलेला कांदा पुर्णपणे पाण्यात भिजला आहे . तर गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे .डोंगर परीसर व कानीफनाथ मंदीर परीसरात एक तासाच्यावर पावसाच्या सरी कोसळल्या . जोरदार पावसाने नदी नाले बंधारे तुडुंब भरून वाहिले. शेतामध्ये कापून टाकलेल्या कांदे पाण्यात आहेत. तर झाकलेले कांदे सोमवारी कांदा मार्केटला कांदा घेऊन जाण्यासाठी वाहणे शेतामध्ये घेऊन जाता आले नाही .हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
0 टिप्पण्या