आ. सुरेश आण्णा धस हे बीड जिल्हयात एक दबंग आमदार म्हणून ओळले जातात . उच्च शिक्षित असूनही मराठवाडयाची रांगडी शैली अन् मातीला त्यांनी सोडलेलं नाही . किंबहूना त्यांच्या रक्तातच ती मुरली आहे. जनतेच्या मदतीला धावून जाण्यास ते नेहमीच तत्पर असतात, मग त्यासाठी बँकेच्या मॅनेजरचे पाय धरायला व धुवायलाही लाजत नाहीत . अगदी अलीकडेच त्यांनी कोरोना प्रबोधन असो की पाणीप्रश्न यावर अनोख्या शैलीतील केलेली आंदोलनं सातत्याने चर्चेत राहिली .
काही दिवसांपर्वीआष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता , जनता त्रस्त झाली होती . बिबट्याला मारण्याची मुभा नाही यावरून त्यांनी थेट अधिकाऱ्यांना व सरकारलाही जाब विचारला , एवढेच नाही तर रोज माणसं मरत आहेत मग विबट्या मात्त्वाचा की माणसं असा सवाल उपस्थित करून परवानगी दिली नाही तरी बिबट्याला मारू असा आक्रमक बाणा दाखविला होता . असे कणखर , बेधडक आमदार धस हे तेवढेच ह्ळवे व संवेदनशिल असल्याचे पुन्हा एकदा या घटनेवरून दिसून आले . याची सर्वत्र चर्चा होत आहे .
0 टिप्पण्या