Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठा आरक्षणाबाबत रणनीती ठरणार *


 

मराठा आरक्षण कायद्यावर २५ जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सदर च्या केस मध्ये अनेक मराठा याचिकाकर्ते आहेत. अशा सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांसोबत सरकार बैठक घेऊन सुनावणीदरम्यान, बाजू मांडण्यासाठी आवश्यक असल्यास ज्येष्ठ विधिज्ञ ऍड हरीश साळवे सारख्या विधिज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

 २५ जानेवारी पासून मराठा आरक्षण कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. त्यासाठी दिल्लीत समन्वय करण्यासाठी ज्येष्ठ मंत्री ना.श्री. अनिल परब व माजी ॲड जनरल श्री विजय थोरात यांनी सरकार तर्फे जबाबदारी घेण्याचाही आज निर्णय झाला. 

 २३ डिसेंबरला ईडब्ल्यूएस चा लाभ मराठा विद्यार्थ्यांना देण्यासंबंधात सरकारने काढलेल्या अध्यादेशाबाबत मराठा समाजात अनेक गैरसमज आहेत. त्याचा विपरीत परिणाम आरक्षणाच्या केस वर होईल अशीही भीती समाजात आहे. त्यासंदर्भात EWS च्या आरक्षणाचा लाभ आरक्षणावरील केसचा अंतिम निर्णय येईपर्यंतच असेल व SEBC आरक्षण मिळाल्यावर EWS आरक्षण बंद होईल असा सुधारित अध्यादेश काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊन त्याप्रमाणे असे शपथपत्रं सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

२०१४चे ESBC व २०१९-२०चे SEBC चे अनेक उमेदवार नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. यासंबंधात सर्व याचिकाकर्त्यांचे वकील, सरकारचे ज्येष्ठ विधिज्ञ यांची सोमवारी दिल्लीत बैठक होऊन त्यावर चर्चा करून त्यासंदर्भात येत्या आठवड्यात मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याचे या बैठकीत मान्य केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परिक्षेसंदर्भात मराठा समाजावर तसेच खुल्या प्रवर्गावर अन्याय करणारी परिपत्रके दि. ३० डिसेंबर २०२० आणि ४ जानेवारी २०२१ रोजी काढली आहेत. सदरच्या परिपत्रकांवर चर्चा करून तातडीने सुधारित परिपत्रके काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला गेला.

मराठा आरक्षणाच्या अशा इतर अनेक प्रलंबित विषयांवर मा. श्री अजितदादा पवार, मा. श्री. एकनाथ शिंदे आणि मा. श्री अनिल परब यांजबरोबर चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यासंबंधात आजच्या बैठकीमध्ये ठरले.

आजच्या बैठकीत मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांसोबत श्री. एकनाथ शिंदे, श्री. अनिल परब, माजी ऍड जनरल श्री. विजय थोरात, तसेच मुख्य सचिव, प्रधान सचिव व इतर अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते अशी माहिती श्री विनायकरावजी मेटे यांनी दिली. त्याचप्रमाणे श्री विनायकरावजी मेटे यांजसोबत श्री सुरेश पाटील, श्री राजन घाग, श्री विनोद पाटील, श्री आबा पाटील, श्री विक्रांत आंब्रे, श्री प्रफुल्ल पवार, श्री अभिजित घाग, श्री रुपेश मांजरेकर, श्री विवेक सावंत, श्री विलास सुद्रीक, श्री सत्यवान राऊत, श्री प्रवीण पाटील, श्री. बलराम भडेकर, आणि अनेक मराठा समन्वयक, मान्यवर अशांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या