खा. डॉ. सुजय विखे पा. यांची माहिती
अहमदनगर :- गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला नगर शिर्डी रस्त्याची
दुर्दशा चर्चेचा विषय ठरला होता. या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता त्यावरून
होणाऱ्या वाहतुकीचा विचार करता , या रस्त्याची किरकोळ डागडुजी न करता मजबुतीकरण
काँक्रिटीकरण व्हावे यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे प्रयत्नशील होते . अक्षरश:
शिर्डी- शिंगणापूर येथील येणाऱ्या भाविकांची परीक्षा पाहणारा शिर्डी
ते अहमदनगर या महामार्गाची साडेसाती संपणार आहे .
सदर महामार्गावरची वाहतूक लक्षात घेता व या रस्त्याच्या
या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले तर या रस्त्याच्या बर्याच समस्या
सुटून वारंवार दुरुस्ती करावी लागणार नाही तसा प्रस्ताव नॅशनल हायवे अथोरिटी
ऑफ इंडिया मार्फत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील
यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता . आज नवी
दिल्ली येथे डॉक्टर विखे यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक
मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रस्ताव बाबत चर्चा केली व त्याचा
पाठपुरावा केला. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या
महिनाभरात हायवे अथोरिटी ऑफ इंडिया मार्फत नगर शिर्डी रस्त्याचे टेंडर केली
जाणार असून, येत्या मार्चअखेर या कामास सुरुवात होईल त्याबाबतच्या सूचना
मंत्री नितींन गडकरी यांनी संबंधित
विभागाला दिला असल्याचे त्यांनी सांगितले . त्यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा
विशेष निधी मंजूर करण्यात आला असून त्यामुळे रस्त्याची शुक्लकाष्ट कायमच संपेल अशी
अपेक्षा खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या