।अहमदनगर :- संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्दच्या सांगवी फाट्यावर पकडलेल्या दोघा
दरोडेखोरांकडून तालुका पोलिसांनी 10 मोटार सायकली हस्तगत केल्या आहे.
शहरातसह विविध भागातुन या मोटारसायकली चोरल्याची कबुली कपडलेल्यांन
दिली आहे. या दुचाकी दरोडेखोरांनी अनेक गावातील विहिरीत लपून ठेवल्या होत्या.
गुरुवारी पहाटे सांगावी फाटा येथे दरोड्याच्या तयारीत असणार्या तिघांना पोलिसांनी
गस्त घालताना ताब्यात घेतले. तर 5 जण पसार झाले होते.
पोलिस त्यांच्या मागावर आहेत. या घटनेत आठ जणांवर गुन्हा दाखल आहेत.
पकडण्यात आलेल्या दोघांकडून विहिरीत व ऊसाच्या शेतात लपविलेल्या
10 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असुन पुढील तपास पोलिस करत आहे
.
0 टिप्पण्या