ऑनलाईन न्यूज नेटवर्क
लोकनेता न्यूज
नवी दिल्ली, 29 जानेवारी: भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज शुक्रवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये (Diesel Petrol Price Today) कोणताही बदल केला नाही आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 86.30 रुपये प्रति लीटर आहेत. दरम्यान मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. याठिकाणी दर जवळपास 93 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहेत. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर याठिकाणी पेट्रोलचे दर 101 रुपये प्रति लीटर झाले आहेत.गेल्या 27 दिवसापैकी एकूण 10 दिवसच इंधनाचे दर वाढले आहेत.
मात्र या दिवसात पेट्रोल एकूण 2.59 रुपये प्रति लीटरने महागले आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये 02.35 रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
महानगरांमधील पेट्रोलचे दर
-दिल्ली: पेट्रोल 86.35 रुपये आणि डिझेल 76.48 रुपये प्रति लीटर
-मुंबई: पेट्रोल 92.86 रुपये आणि डिझेल 83.30 रुपये प्रति लीटर
-कोलकाता: पेट्रोल 87.69 रुपये आणि डिझेल 80.08 रुपये प्रति लीटर
-चेन्नई: पेट्रोल 88.82 रुपये आणि डिझेल 81.71 रुपये प्रति लीटर
-नोएडा: पेट्रोल 85.67 रुपये आणि डिझेल 76.93 रुपये प्रति लीटर
-रांची: पेट्रोल 84.80 रुपये आणि डिझेल 80.91 रुपये प्रति लीटर
-बंगळुरू: पेट्रोल 89.21 रुपये आणि डिझेल 81.10 रुपये प्रति लीटर
-पाटणा: पेट्रोल 88.78 रुपये आणि डिझेल 81.65 रुपये प्रति लीटर
0 टिप्पण्या