तू निघालास....
जाणाऱ्या पाहुण्यालाही आनंदाने निरोप देणारी आमची संस्कृती
पण....
तुझ्याबाबतीत नेमकं कसं व्यक्तं व्हावं हेच समजेनास झालंय.
नेहमीच्यापेक्षा जल्लोषात तुझं स्वागत केलं होतं.
कारण इतर वर्षांपेक्षा एक दिवस जास्तीचा घेवून आला होतास.
वाटलं होतं इतर वर्षांपेक्षा काही वेगळे रंग भरशील सर्वांच्याच जगण्यात.
पण....
रंग भरण्याऐवजी,
असे रंग दाखवलेस, कि जगणंच असह्य केलंस सर्वांचं....
माणसांनाच माणसापासून तोडलंस!
प्रत्येकाच्या कुणा ना कुणा जिवलगांना अगदी वयाचं अंतर न पाहता अल्लद
त्यांच्या पासून दूर नेलंस,
कधीही न
परतण्याच्या बोलीवर....
अगदी त्यांची शेवटची भेटही घेवू दिली नाहीस कुणाला.
ज्यांच्या घरातील माणसं गेली. ती तर मनानं पार खचून गेली.
प्रत्येकाच्या डोळ्यात भिती, चेहऱ्यावर चिंता आणि प्रत्येकाच काळीज
आक्रंदत राहिलं.
रात्रंदिवस टांगती तलवार ठेवलीस प्रत्येकाच्या डोक्यावर....
काहींनी घाबरुन जीवन संपवलं.
तर काही भुकेने गेले.
घरी जाण्यासाठी निघालेल्या काहिंना सरळ देवाघरी नेलेस!!!
संपूर्ण मानव जातीला चारभिंतीत कैद करून तू विध्वंसक थैमान घातलंस.
आणि सोबत निसर्गालाही बोलावलंस!!
त्याने तर कैक पिढ्या माणसाने त्याच्यावर केलेल्या अत्याचाराचा सुडच उगवला.
त्यात आमचा शेतकरी भरडला, राबराब राबून पिकवलेलं शेत आणि कष्ट करून
उभारलेलं घर डोळ्यासमोर वाहून गेलेलं पाहताना, काळीज फुटेस्तोवर उर बडवून रडला....
आबालवृध्दांची जगण्याची इच्छाच मारलीस.
बालकांच्या आयुष्यातील आनंदाचं एक वर्ष तू हिरावून घेतलंस.
भयाचे,
वाईटाचे, वेदनेचे अवघड डोंगर रचून ठेवलेस.
*या सगळ्या
वाईटात मात्र काही चांगल्या गोष्टी शिकवल्यास*.
निसर्गाला काही काळ का होईना मोकळा श्वास घ्यायला दिलास.
माणसाला,
जगण्याचं भान
दिलंस.
माणसासोबत माणसाला माणसासारखं वागायला भाग पाडलंस.
गरिब-श्रीमंत,
उच्च-निच, मंगल-अमंगल भेद विसरायला लावलेस.
एका एका श्वासाची किंमत दाखवून दिलीस.
कुटुंबात सुसंवाद घडवलास.
कमीत कमी साधनात जगता येतं, याची पुन्हा आठवण करुन दिलीस.
छोटे छोटे अनेक बदल घडवलेस तरीही....
तुझा दु:खाचा तराजू जडच होता.
म्हणूनच....
तू
निघतोयस तर मी
तुला एवढचं म्हणेन....
*SORRY
GOOD BYE 2020....
2 टिप्पण्या
👌🏼👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवा🙏🙏