Ticker

6/Breaking/ticker-posts

देवगड येथे श्री दत्त जन्मोत्सव साजरा


श्री क्षेत्र देवगड -भू-लोकीचा स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे मंगळवारी "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...दत्तात्रय भगवान की जय" असा दत्त नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टी करत सायंकाळी ६ वाजता  भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.कोरोनाची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या,सारे विश्व सुखी होऊ द्या असे साकडे दत्त जन्म प्रसंगी महंत भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना घातले.

यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने श्री क्षेत्र देवगड मंदिर प्रांगणात श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत  भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.मंगळवारी सायंकाळी ६ वाजता श्री दत्त मंदिरात छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या श्री दत्त जन्मोत्सव सोहळयाच्या प्रसंगी पहाटे महंत  भास्करगिरी बाबांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येऊन अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर भास्करगिरी बाबांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात येऊन आरती करण्यात आली.

यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी महंत सुनीलगिरी महाराज,महंत योगी ऋषीनाथ महाराज, गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मातोश्री श्रीमती सरूबाई पाटील,खासदार सदाशिव लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे,माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे,सौ.धनश्री विखे,बदनापूरचे आमदार नारायण कुचे,आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी, सरपंच अजय साबळे, बाळासाहेब पाटील यांच्यासह संत महंत उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या