Ticker

6/Breaking/ticker-posts

स्विफ्ट कारने घेतला अचानक पेट सुदैवाने चालक बचावला

 


राशिन - रात्री राशीहून कर्जतकडे येत असणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच 11 बी व्ही 0 293 या गाडीने अचानक पेट घेतला यावेळी गाडी चालवत असणारे प्रशांत पांडुरंग जमदाडे (राहणार राशीन ता. कर्जत) यांनी तात्काळ राशिन पोलीस स्टेशन मध्ये  पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ कर्जत येथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याबाबत कळवले.

     माहिती मिळताच चंद्रशेखर यादव हे पोलिस कर्मचाऱ्यांसह अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले या नंतर तिथे कर्जत नगरपंचायतीची अग्निशामक दलाची गाडी व कर्मचारी पोचले दरम्यान स्थानिक नागरिकही त्या ठिकाणी धावत आले, आणि सर्वांनी मिळून ही आग आटोक्यात आणली. एवढेच नव्हे तर कारमध्ये अडकलेल्या प्रशांत पांडुरंग जमदाडे यांना देखील सहीसलामत कारच्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान ही घटना कशामुळे घडली कारने पेट नेमका कोणत्या कारणाने घेतला, याचा शोध आता पोलिस घेणार आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या